दहिवडी : ता.२२
शासनाच्या असणाऱ्या रुग्णवाहिका वेळेवर न पोहचू शकल्यामुळे आपण अनेकांनी आपले प्राण अपघातानंतर गमावले असल्याचे आपण पाहत असतो. परंतु माण- खटाव तालुक्यातील जनतेला स्वखर्चातून टँकर द्वारे मोफत पाणीपुरवठा करणारे शेखरभाऊ गोरे हे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनात जलनायक तर ठरलेच आहेत, आता मात्र ते आपल्या दुसऱ्या सामाजिक कामामुळेही चर्चेत आहेत. अपघात झाला की माण खटाव तालुक्यातील लोक सरकारी रुग्णवाहिकेला फोन करण्याऐवजी शेखरभाऊ गोरे यांच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधत आहेत.
सरकारी रुग्णवाहिकेपेक्षा तात्काळ आणि मोफत सेवा देणारी शेखरभाऊ गोरे यांच्या प्रतिष्ठानच्या नावाने असलेल्या त्या रुग्णवाहिकेने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. माण खटाव तालुक्यातील अपघातग्रस्त लोकांसाठी तात्काळ सेवा देऊन त्यांना वेळेवर दवाखान्यात पोहचल्याने अनेकांचे प्राण देखील वाचले आहेत. त्यामुळे शेखरभाऊ गोरे हे आता अपघातग्रस्तांसाठी देवदूत आहेत,अशी चर्चा सध्या रंगली आहे.
दुष्काळी जनतेला टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा तर दुसरीकडे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणारी शेखरभाऊ गोरे यांच्या प्रतिष्ठानची रुग्णवाहिका, यामुळे शेखरभाऊ गोरे यांना जनता आशीर्वाद देत आहे.
दोन दिवसांपूर्वी गोंदवले येथे एका रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यावेळी खाजगी गाडीतून संबंधित रुग्णाला दवाखान्यात आणावे लागले होते. मात्र शेखर भाऊ गोरे यांच्या रुग्णवाहिकेशी संपर्क केला की काही वेळातच ती घटनास्थळी पोहचून रुग्णांना तात्काळ मदत मिळवून देत उपचारार्थ दवाखान्यात दाखल करत असते. काल पांगरी येथे झालेल्या भीषण अपघातात सहापैकी दोन जण ठार झालेच मात्र उर्वरित लोकांना तात्काळ उपचार मिळवून देण्यात शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे शेखरभाऊ गोरे हे सध्या माण खटाव तालुक्यातील अपघात ग्रस्तांसाठी देवदूत ठरले आहेत.
