राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासमवेत सूपने येथे साजरा.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज १० जून रोजी २३ वा वर्धापनदिन आहे. कोणतीही संघटना, राजकीय पक्ष किंवा संघटनेचा वर्धापनदिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण असतो. त्याचबरोबर आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहावलोकन करत पुढील प्रवासाचा निर्धार करण्याचा क्षण असतो. त्यामुळेच, देशातील पाचव्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा वर्धापनदिन माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी उर भरून आणणारा दिवस आहे.सातारा जिल्ह्याचे खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील यांच्यासमवेत सुपने गावातील राष्ट्रवादीच्या तरूण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा 23 वा वर्धापन दिन केक कापून साजरा केला.
यावेळीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समर्थक व सूपने गावचे ग्रामपंचायत सदस्य मा. गणेश माळी, एकता प्रतिष्ठान अध्यक्ष सुहास पाटील, पैं. प्रशांत पाटील, बजरंग पाटील (सोसायटी संचालक) ,व गावचे सरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थ ,शेतकरी बंधू त्याच बरोबर महिलाही उपस्थित होत्या.