महाराष्ट्र न्यूज पुसेसावळी प्रतिनिधी :
केन अ़ँग्रो डोगराई साखर कारखान्यावर बुधवार पासुन भारतीय मराठा महासंघ शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष आधिकराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली
आंदोलन करण्यात आले आहे.
आतापर्यत शेतकर्यांना फसवत आलेले कारखान्यातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला व लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यावर त्याच्या ऊसाचे पैसे जमा करावेत अन्यथा शेतकर्यासाठी मी स्वतः कायदा हातात घेऊन शेतकर्यांना न्याय मिळवून देणार त्याच्या कष्टाचे पैसे मिळवून देणार असे भारतीय मराठा महासंघाचे शेतकरी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आधिकराव सावंत यांनी म्हटले आहे व काही दिवसात जिल्ह्यात आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे