03/09/2020 रोजी आयसीआयसीआय बँक लिमिटेड सातारा, चोला मंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड सातारा , एचडीबी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड सातारा, इंडोसंड बँक लिमिटेड सातारा, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड सातारा इत्यादींना सकाळी 11 वाजता वरील निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आली.
आमच्या प्रमुख मागण्यांवर त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर दिनांक 10/09/2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रकारची व्यवसायिक वाहने आम्ही बँक व फायनान्स कंपन्यांकडे जमा करणार आहोत असा इशाराही सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवासी वाहतूक असोसिएशन ने दिला आहे.यावेळी अक्षय गवळी (सावकार ट्रॅव्हल्स), बाबा शेख (साई ट्रॅव्हल्स), धनंजय निकम (पुष्कराज ट्रॅव्हल्स), हर्षद पवार (हर्षद ट्रॅव्हल्स), एकनाथ जाधव (अष्टविनायक ट्रॅव्हल्स), हर्षद पवार (अद्वेत ट्रॅव्हल्स), जुबेर शेख, अमीर शेख, ताहीर शेख- (बबलूराज ट्रॅव्हल्स), अण्णा वायदंडे (रेखा ट्रॅव्हल्स), समीर दोडमनी (रेणुका ट्रॅव्हल्स), अजित पाटील (वक्रतुंड ट्रॅव्हल्स), जितेंद्र वंजारी (जेसी वंजारी ट्रॅव्हल्स), दादासाहेब शिर्के , रमेश कदम (ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स), महेश जाधव (चिंतामणी ट्रॅव्हल्स) इत्यादी उपस्थित होते.