वाठार गटात दोन्ही तात्या एकत्र दिसल्याने लोकांमध्ये समाधान-
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाठार कि. जिल्हा परिषद गटातील दोन्ही तात्या म्हणजे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक कांतीलाल पाटील व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड हे दोन्ही नेते बऱ्याच दिवसापासून एकत्र दिसले नाहीत, परंतू आज मोहितेवाडी ता.कोरेगाव येथील श्री राजाराम रामचंद्र उबाळे-पाटील यांचे चिरंजीव राकेश यांच्या विवाह सोहळ्याच्या निमिताने पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या सोबत एकत्र आल्याने स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने हे देखील उपस्थित होते.
सध्या दोन्ही तात्या एकत्र आल्यास, येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होण्यास काहीच अडचण येणार नसल्याबाबतच्या चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागल्या आहेत.




















