बिजवडी – ता.माण येथील श्री संत गाडगे महाराज अनु.जाती प्राथमिक /माध्यमिक विद्यालयाला सामाजिक कार्यकर्ते वैभव पोरे यांच्या प्रयत्नातून दुर्गसंवर्धन व उर्मी या संस्थेच्या पुढाकारातून अँफिनिटी एक्स प्रा.लि.कंपनीच्या सीएसआर फंडातून साहित्यरूपी मदत करण्यात आली. बिजवडी ता.माण येथील या विद्यालयात अनाथ ,दिनदलित ,अनु.जाती प्रवर्गातील मुलेमुली शिक्षण घेत असून हे विद्यालय विनाअनुदानित आहे.गुरूजनवर्ग पगाराविना या मुलांना ज्ञानार्जनाचे काम करत आहेत.या विद्यालयाच्या मदतीसाठी वैभव पोरे यांच्या माध्यमातून अँफिनीटी ,दुर्गसंवर्धन ,उर्मी सारख्या संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत.साहित्य वितरणप्रसंगीअँफिनीटी एक्स प्रा.लि.चे प्रकाश अय्यर ,सिनियर मँनेजर संतोष जाधव ,उर्मी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष राहुल शेंडे ,दुर्गसंवर्धनचे संतोष जाधव ,सामाजिक कार्यकर्ते वैभव पोरे ,बांधकाम व्यावसायिक खेडेकर साहेब , जिगिशा कोटक ,कल्पना शहा ,मानसी मँडम ,ललित बोन्धे ,आशिष सानकाये ,रोशन पवार ,शैलेंद्र सर ,आकाश भिंताडे,संचालक शिवाजीराव महानवर ,मुख्याध्यापिका सौ.सुरेखा महानवर ,एल.जी.महानवर,डी.एस.दडस आदी शिक्षक वर्ग ,कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी या विद्यालयाला चार स्टील कपाटे ,प्रोजेक्टर ,स्मार्ट टीव्ही ,चार अग्निशामक संच ,संगणक ,संगणक टेबल ,मनोरंजन साहित्य आदी साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना ,अँफिनीटीचे प्रकाश अय्यर म्हणाले ,आपले भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज असून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना देव मानत शिक्षण घेऊन मोठे व्हावे.तुमच्या मदतीसाठी अँफिनीटी कंपनी तुमच्या पाठीशी यापुढेही खंबीरपणे उभी राहील.संतोष जाधव म्हणाले ,शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा.तुमच्या जडणघडणीत खारीचा वाटा म्हणून आम्ही मदतीच्या माध्यमातून तुमच्या बरोबर राहू.कल्पना मँडम म्हणाल्या ,गाडगे महाराजांचे हे खूप छान शैक्षणिक संकुल आहे.शिक्षणाचा मनमुराद आनंद घ्या.खेळा ,मज्जा करा.मस्ती करा जीवन सुंदर आहे त्याचा आनंद घ्या.आपले जीवन सुंदरमय होईल.दुर्गसंवर्धनचे संतोष जाधव म्हणाले ,विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन सक्षम व्हावे.स्वत:ला मोठे करत आजूबाजूच्या लोकांना मोठे करण्यासाठी प्रयत्न करा.जस मुलांनी तालासुरात गाण म्हटल त्याप्रमाणे तालासुरात शिक्षण घ्या.दुर्गसंवर्धनच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्न करू.खेडेकर साहेब म्हणाले ,महानवर बापू अनाथ ,गोरगरीब मुलांचे भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत.आम्हीही या कार्यास हातभार लावणार आहे.वैभव पोरे साहेब नोकरीनिमित्त शहरात असतानाही त्यांनी गावाची नाळ जोडून ठेवलीय.विविध मदतीच्या माध्यमातून लोकांना ते प्रोत्साहन देण्याचे काम करतायत. वैभव पोरे म्हणाले,वंचित घटकांच्यागरजा पूर्ण करण्यासाठी विविध संस्थाच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत.या कार्यात उर्मी ,दुर्गसंवर्धन , अँफिनीटीचे मोठे योगदान मिळत आहे.दुर्गसंवर्धनचे संतोष सरांचे मोठे काम आहे. आदिवासी पट्ट्याप्रमाणे ते दुष्काळी भागातही आपले काम करत आहेत.या शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत मदतीचा ओघ असाच सुरू ठेवू. संस्थेचे संचालक शिवाजीराव महानवर यांनी उपस्थित मान्यवरांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.प्रास्ताविकात मुख्याध्यापक एल.जी.महानवर यांनी शाळेच्या कामकाजाविषयी माहिती देत शाळेच्या आवश्यक भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी उपस्थित मान्यवरांकडे मागणी केली.सूत्रसंचालन संतोष मगर यांनी करून आभार इनामदार यांनी मानले.
बिजवडी ता.माण येथील विद्यालयात अँफिनीटी एक्सतर्फे विविध साहित्याचे वितरण करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर ….