महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; कराडचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. नवनिर्वाचित संचालकांची सभा दिनांक 16.11.2022 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जाधव यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.शिवाजी संकपाळ उपस्थित होते. त्यामध्ये अध्यक्षपदी श्री.चंद्रशेखर महादेव देशपांडे यांची तर उपाध्यक्षपदी डॉ.मिलिंद शंकर पेंढारकर यांची एकमताने निवड झाली. नवनिर्वाचित संचालकांमध्ये सर्वश्री डॉ.प्रकाश सप्रे, डॉ.अविनाश गरगटे, सीए. शिरीष गोडबोले, श्री.एकनाथ फिरंगे, श्री.जितेंद्र शाह, श्री.हिंदुराव डुबल, श्री.मोहन सर्वगोड, डॉ.सुचिता हुद्देदार, सौ.वर्षा कुलकर्णी, सौ.पुनम वास्के, हे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. श्री.प्रविण देशपांडे, श्री.दिपक जोशी, श्री.अभिजीत चाफेकर, श्री.सुनिल कुलकर्णी यांना नव्याने संधी मिळालेले संचालक ही उपस्थित होते.
अध्यक्ष निवडीनंतर बोलताना श्री.चंद्रशेखर देशपांडे म्हणाले, संस्थेच्या सद्यस्थितीत ठेवी रु.531 कोटीं कर्जे रु.316 कोटी इतकी आहेत. तर संमिश्र व्यवसाय रु.847 कोटी इतका आहे. नजीकच्या काळात 1000 कोटी व्यवसायाचे उद्दीष्ट ठेवले आहे. सर्व सहकारी संचालकांचे मदतीने ते पूर्ण करणेचे प्रयत्न करेन. तसेच नवनवीन उपक्रम राबवून संस्थेस प्रगती पथावर नेण्यास प्रयत्नशील राहू.
डॉ.मिलिंद पेंढारकर म्हणाले मागील काही वर्षे सहकारी संचालकांबरोबर काम करताना त्यांचे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. यापूर्वी उपाध्यक्ष पदाचा अनुभव आहेच तो अनुभव लक्षात घेवून आणखी जोमाने काम करेन आणि अध्यक्ष श्री.चंद्रशेखर देशपांडे व सर्व संचालकांच्या मदतीने यशस्वी होवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मा.उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी श्री संदीप जाधवसो व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.शिवाजी संकपाळ यांनी सर्व संचालकांचे तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्षांचे कर्मचाऱ्यांच्या वतीनेही अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विनायक फडके यांनी आभार मानले.