नवारस्ता प्रतिनिधी : श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर काँलेजमध्ये बी.एस्सी.भाग-३ व बी.काँम. भाग-३ या वर्गांतील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ प्रसंगी सौ.मंगलताई जगताप महिला महाविदयालय उंब्रज चे ग्रंथपाल श्री. विकास बर्गे बोलत होते. पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असताना तो उद्याचा सुजाण नागरिक बनणार आहे. भविष्यात तो जबाबदार नागरिक बनण्यासाठी मिळालेल्या ज्ञानाचा वापर करुन अर्थाजनाच्या संधीचा शोध घेतला पाहिजे. विविध कौशल्ये आत्मसात केल्यानेच स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांनी करिअर साठी जागरुक असले पाहिजे. कार्यक्रम प्रसंगी कु.पाचपुते, ओमकार देशमुख व समाधान गव्हाणे या विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. व्ही. एन. कांबळे सर होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कु. टी. ए. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. के. पी. देसाई यांनी केले व आभार प्रा. पी. एम. घोणे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. शिर्के आर. एम., प्रा. पाटील, प्रा. डिगे व प्रा.पानस्कर उपस्थित होते. या कार्यक्रमास विदयार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.