वडगाव निंबाळकर प्रतिनिधी संतोष भोसले
बहुजन हक्क परिषद संघटनेच्या पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी चोपडज (ता.बारामती) येथील अजर तांबोळी यांची निवड झाली आहे. नुकत्याच होळ ता.बारामती येथे संघटनेच्या झालेल्या बैठकीत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल धिवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र युवक अध्यक्ष नानासाहेब मदने, कैलास धिवार, बबन भंडलकर, हनुमंत भंडलकर, नामदेव भिसे, विजय वाघमारे, ऋषिकेश खोमणे आदी उपस्थित होते. समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन संघटनेने ही संधी दिली असून आगामी काळात युवकांना बरोबर संघटनेचे कार्य करणार असल्याचे तांबोळी यांनी निवडीनंतर सांगितले.