कृष्णा फार्मसी महाविद्यालयात पदविका प्रवेशासाठी सुविधा केंद्र
कृष्णा अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठात ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पार पडला. यावेळी विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी योगासने केली.
आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत असून, त्यावर योग-प्राणायाम हा उत्तम उपाय आहे. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नियमित योग गरजेचा असून, याबाबत जागृती करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. कृष्णा अभिमत विद्यापीठात योग प्रशिक्षक महालिंग मुंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासने केली.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, दंतविज्ञान अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपी अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलू, सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात योगासने सादर करताना अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी.कृष्णा फार्मसी महाविद्यालयात पदविका प्रवेशासाठी सुविधा केंद्र महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे डी. फार्मसीसह अन्य पदविका अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनामार्फत ठिकठिकाणी सुविधा केंद्र सुरू केली असून, येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा फार्मसी महाविद्यालयाला सुविधा केंद्र मान्यता देण्यात आली आहे.
शैक्ष्रणिक वर्ष २०२१-२२ साठी औषधनिर्माण शास्त्र (डी.फार्म) या १२ वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला नुकताच प्रारंभ झालेला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना कागदपत्रे तपासणी आणि अर्ज निश्चितीकरणासाठी ई-स्क्रुटनी म्हणजेच अर्ज भरण्यापासून तो निश्चित करणे हे सर्व ऑनलाईन करण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे तपासणी, अर्ज निश्चित करणे तसेच विकल्प भरणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ८ जुलैपर्यंत हे सुविधा केंद्र सुरू राहणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या केंद्राचे समन्वयक प्रा. अभिजीत कचरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृष्णा फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शुभांगी पाटील यांनी केले आहे.Attachments area