उंब्रज : कराड मर्चट सहकारी क्रेडीट संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवड नुकतीच पार पडली यामध्ये घोणशी गावचे सुपुत्र व सह्याद्री कारखान्याचे विद्यमान संचालक मा.श्री.माणिकराव पाटील यांची कराड मर्चटच्या अध्यक्षपदी निवड झाली तसेच कराडचे रहिवाशी नामांकित बांधकाम व्यवसायिक मा.श्री.शिवाजीराव जगताप यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली.श्री.माणिकराव पाटील यानी बँकीग क्षेत्रात संस्थेचे संचालक म्हणुन व सहयाद्री कारखान्याचे संचालक म्हणुन उत्तम कामगिरी राहिली असुन त्यांची लोकांशी चांगल्या प्रकारची सामजिक जवळीक आहे त्यांच्या कमाची दखल घेवुन संस्थेचे संस्थापक श्री.सत्यनारायण मिणीयार दसर्व संचालक यानी त्यांची चेअरमनपदी तसेच बांधकाम व्यवसायिकव सर्व विषयाचे सखोल ज्ञान असणारे श्री.शिवाजीराव जगताप यांची व्हा.चेअरमनपदी नियुक्ती केली यानंतर श्री.सत्यनारायण मिणीयार यांचे हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना श्री.पाटील म्हणाले की सभासदांच्या विश्वासास पात्र राहुन सस्थेने दिलेली जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पारपाडणार आहे तसेच संस्थेचा विस्तार व नावलौकिक वाढविण्यासाठी कायम प्रयत्नशिल राहणार असलेचे सांगितले. कराड मर्चट संस्थेची वाटचाल आधुनिकीकरणाकडे सुरु असुन संस्थेने ऑनलाईन बँकीग पध्दती स्वीकारली आहे संस्थेतुन आर टी जी एस/ एन ई एफ टी./ आय एम पी एस सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत तसेच चेअरमनपद निवडी निमित्त करोना महामारी व आर्थिक संकटामुळे मुलांचे शालेय नुकसान होवु नये यासाठी संस्थेने ७ % व्याजदाराने मर्चट अध्ययन शैक्षणीक कर्ज योजना लागु केली आली आहे त्याचा सर्व ग्राहकानी, विद्यार्थी पालकानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करणेत आले.नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे निवडी बद्यल त्यांचे सहकार मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील, मा.खासदार श्री.निवास पाटील, राज्य मंत्री.विश्वजीत कदम, लोकशाही अघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनिल माने, राज्य लेखा सचिव शहाजी क्षीरसागर, माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर व अशा अनेक मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.