वाई : नीट, जेईई, सीईटी अशा विविध स्पर्धापरीक्षांची तयारी करून घेणाऱ्या वाईतील दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थींनी जेईई मेन २१ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या वर्षी दिशा ॲकॅडमीचा सक्सेस रेशिओ ७५% टक्के आहे. परीक्षेला बसलेल्या ९५ विद्यार्थ्यांपैकी ७१ विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. शुभम पडवळ (९८.४६ परसेन्टाईल), ओम वाईकर (९७.०९ परसेन्टाईल), मंदार दिघे (९६.७३ परसेन्टाईल), ओमकार लुंगे (९६.४२ परसेन्टाईल), राहूल डांगे (९५.४६ परसेन्टाईल) हे विद्यार्थी अव्वल स्थानी आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये १५ विद्यार्थ्यांनी ९० परसेन्टाईलपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, तर ४० विद्यार्थ्यांनी ८० परसेन्टाईलपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. लक्ष बँचमधील २५ पैकी २५ विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदन म्हणाले; संकटाच्या काळात मन स्थिर ठेऊन उद्दीष्टाकडे वाटचाल करण्यात खरा कस लागतो, पण विद्यार्थ्यानी घेतलेले कष्ट आणि दिशातील तज्ञ अनुभव शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे तसेच कोरोनाच्या या संकट काळात विद्यार्थ्याचे मनधैर्य वाढविण्याच्या केलेल्या प्रयत्नाचे एकत्रित यश जेईई मेन परीक्षेच्या निकालातून समोर आले आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाबरोबर शैक्षणिक क्षेत्रासाठी भरीव कामगिरी करण्यासाठी दिशा सातत्याने पयत्न करेल असेही प्रा. नितीन कदम यांनी नमूद केले आहे.
दिशा ॲकॅडमीचे शिक्षक, कर्मचारी व पालकवर्गाने यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंद करत, भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
