महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / खटाव :
सध्या कोरोना संसर्ग इतकाच घातक समाज माध्यम ठरू लागला आहे. एका व्हिडिओ ने वायरमनला पुन्हा शॉक दिला. समाज माध्यमातून हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या वायरमनला सुध्दा नवल वाटले. हा व्हिडिओ पाहताना अनेकांच्या छातीत धस्स हाेत आहे.
या बाबत माहिती अशी की काही दिवसांपूर्वी वायरमनाला डी पी वर दूरस्थ करताना शॉक लागला होता. त्यावेळी तातडीने विद्युत यंत्रणा बंद करण्यात आली. तारांना चिकटून वायरमन तेथेच निपचीत पडते होते. हा व्हिडिओ पुसेगाव ता. खटाव येथील महावितरण कार्यालयात वायरमन म्हणून काम करणारा संदीप महादेव वाघ (रा. मोळ ता. खटाव) यांचा होता. या अपघातात ते जखमी झाले होते व आत्ता ते उपाचारानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामावर रुजू झाले आहेत. नंतर त्या व्हिडिओ मधील लाईनमन आवळे यांनी “मरुदे मेला तर” हे वाक्य स्पस्ट ऐकू येत असून यावर महावितरण विभाग यांच्याकडून अद्याप कोणतीही दखल अथवा कारवाई करण्यात आली नाही असे दिसत आहे. इतका भयानक प्रकार सदर व्हिडीओमध्ये दिसत असताना महावितरण विभागाकडून कारवाई का केली जात नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सुमारे एक महिन्यांपुर्वी पुसेगाव हद्दीतील पुसेगाव-वडूज रस्त्यावर असलेले शंकर पार्वती सर्व्हिसिंग सेंटर येथील सिंगल फेज डीपी वरील दुरुस्ती करताना हा अपघात झाला होता. व्हिडिओमधील घटना सत्य असली तरी त्याचा कालावधी एक महिना झाला होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतीही खातर जमा न करता अनेकांनी आपल्या बुद्धीचा पुरवठा तसाच सुरू ठेवला होता. त्यामुळे सदर घटना ताजी घडल्याचे समजून काहींनी दिवसभर विचारणा केली. दरम्यान वायरमन संदीप वाघ यांनी मी ठणठणीत असून पुन्हा कामावर हजर झालो असे सांगतच आपली काळजी सर्वजण करीत आहेत.
सध्या लॉक डाउन व घरोघरी मोबाईलचे जाळे निर्माण झाले आहे. महत्वाच्या कामांचा वेळी नेट मिळत नाही. काही वेळा रेंज नसते. अशा वेळी फालतू व खात्री न करता फारवर्ड मेसेज करणारी आपल्याकडे माहितीचा संग्रह आहे. हे दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे इतरांना ही त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच युट्युब चॅनलने तर सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा आता चिंतेचा विषय ठरला आहे अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.