सह्याद्रिने वस्तु व सेवा करापोटी शासनाकडे भरले रू 38 कोटी 79 लाखवस्तु व सेवा कर खात्याकडून
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : सह्याद्रिचा सन्मानकारखान्याने वस्तू व सेवा कर वेळेत भरण्याबाबत कारखान्याचे चेअरमन मा. श्री बाळासाहेब पाटील यांच्या कटाक्षाने सुचना असतात . त्यानुसार सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने वस्तू व सेवा कर कायद्याखाली सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधीक कराचा वेळेत भरणा केल्याबद्दल वस्तू व सेवा कर दिनाचे औचित्य साधून , वस्तू व सेवा कर खात्याने कारखान्याचा सन्मानचिन्ह देवून गौरव केला . कारखान्याने सातारा जिल्ह्यातील खाजगी व सहकारी साखर कारखानदारीमध्ये पहिला क्रमांकाने व सर्व उद्योगामध्ये जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाने सर्वाधीक वस्तू व सेवा कराचा केलेला एकूण भरणा रूपये ३८ कोटी ७ ९ लाख रकमेचा आहे . याबद्दल , राज्य कर उपायुक्त ( प्रशा . ) मा.सौ.तेजस्विनी मोरे , मा.श्री नंदकुमार सोरटे , मा.सौ. अश्विनी ठाणेकर – राज्यकर उपायुक्त , यांच्या उपस्थितीमध्ये कारखान्यास प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
सन्मानचिन्हाचा स्विकार कारखान्याचे वतीने कारखान्याचे डेप्यु.चीफ अकौंटंट श्री ए.पी.पाटील व त्यांचे सहकारी श्री विजय देसाई यांनी केला . वस्तू व सेवा कर वेळेमध्ये भरणा केल्याबद्दल मा . कार्यकारी संचालक श्री आबासाहेब पाटील यांनी डेप्यु . चीफ् अकौंटंट श्री ए.पी.पाटील , श्री विजय देसाई व त्यांचे सहकारी यांची प्रशंसा केली.