नवारस्ता प्रतिनिधी : संजीवन मेडिकल सेंटर कराड चे प्रमुख डॉक्टर विजयसिंह राजाराम पाटील हृदयरोग तज्ञ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाटणवासीयांच्या तसेच परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी पाटण येथे संजीवन मेडिकल सेंटर पाटण या नवीन हॉस्पिटलची सुरुवात ही दिनांक ३ जुलै २०२२ रोजी करण्यात आली आहे. डॉ. राजाराम निवृत्ती पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी १० वाजता संजीवन मेडिकल सेंटर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
संजीवन मेडिकल सेंटर पाटण हे प्रामुख्याने पाटण व पाटण परिसराच्या ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी उभे करण्याचा त्यांचा मानस आज पूर्ण झाला. यापूर्वी २००९ मध्ये डॉ. विजयसिंह पाटील यांनी पाटण तसेच पाटणच्या परिसरातील रुग्णांना सेवा देण्याचे काम केले होते. उत्कृष्ट सेवा देणारे डॉक्टर पुन्हा पाटण वासियांच्या सेवेस लाभणार असल्यामुळे पाटणवासीयांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. विजयसिंह पाटील हृदयरोग तज्ञ, महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी, हृदयरोग व मेडिसिन विभाग, संजीवन मेडिकल सेंटर पाटण येथे रुग्णांना सेवा देण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत तसेच त्यासोबत त्यांच्या पत्नी डॉ. योगिता विजयसिंह पाटील, नेत्ररोग तज्ञ या दर सोमवारी व गुरुवारी नेत्ररोग विभाग पाहतील. यामध्ये वृद्ध लोकांच्या डोळ्यांविषयीची समस्या तसेच त्यांचे निदान व उपचार अतिशय अल्प दरात उपलब्ध करून देणार असून विविध शिबिरांमध्ये मोफत उपचार करतील. त्याचबरोबर डॉ. भाग्यश्री सुहास पाटील स्त्री रोग तज्ञ व वंध्यत्व तज्ञ या शुक्रवारी स्त्रियांच्या समस्या व निदान व उपचार पाहतील. अशा पद्धतीने संजीवन मेडिकल सेंटर पाटण तर्फे प्रमुख चार विभाग आपण चालू करीत आहोत. अशी माहिती डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी दिली. या हॉस्पिटलमध्ये आज पासून पाटण व परिसरातील ग्रामीण भागातील लोकांच्या सेवेसाठी प्रामुख्याने चार विभाग सुरू करण्यात आले आहेत. १.हृदयरोग विभाग २. मेडिसिन विभाग ३.नेत्ररोग विभाग ४.स्त्रीरोग व वंध्यत्व विभाग. त्यासोबतच अत्यावश्यक सेवेसाठी संजीवन मेडिकल सेंटर पाटण तर्फे 24 तास अत्यावश्यक रुग्णवाहिका सेवा सुद्धा करून दिली आहे, जेणेकरून कोणताही अत्यावश्यक सेवेचा रुग्ण पुढील उपचारासाठी वेळेत पुढील सेंटरला पाठवता येईल.सर्व रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा व आपले आरोग्य निरोगी ठेवा. असे आवाहन डॉ. विजयसिंह पाटील यांनी याप्रसंगी केले. संजीवन मेडिकल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. चंद्रकांत यादव, डॉ. बी. बी. पाटील, डॉ. आर. वी. पानस्कर, डॉ. वि.डी. रणनवरे, डॉ. एन.एन.खोत, डॉ. बाबासाहेब सावंत, डॉ. सचिन सुर्वे, डॉ. विजय साठे, डॉ. संदिप पाटील, संदिप देसाई, सचिन कुंभार लॅब असोसिएशन, मेडिकल असोसिएशन व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.