लोणंद,प्रतिनिधी
येत्या रविवारी देशभरात साजरा होत असलेल्या बकरीईद सणाच्या पार्श्वभूमीवर लोणंद येथील मुस्लिम समाज बांधवांची मिटिंग लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
लोणंद पोलीस ठाण्यात प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आज लोणंद मधील प्रतिष्ठित मुस्लिम बांधवांना आगामी बकरी ईद सणाच्या दृष्टीने यापूर्वी पवित्र रमजान काळात मुस्लीम समाजाने प्रशासनास सहकार्य केले आहे; येणाऱ्या बकरी ईद सणामध्ये देखील अशाच प्रकारचे सहकार्य करावे तसेच सर्वांनी बकरी ईद सण आनंदाने व शांततेत साजरा करावा, शासनाच्या निर्णयाप्रमाणे कुर्बानी न करण्याचे आदेश असल्याने प्रतिकात्मक कुर्बानी करावी तसेच बकरी ईद ची नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी शांततेत अदा करावी अशा सूचना केल्या.
यावेळी लोणंद मुस्लिम समाज ट्रस्टी साजिद बागवान, राजू भाई कुरेशी, सत्तार काझी ,महम्मदशेठ कच्छी , बबलू इनामदार ,अब्दुल जब्बार पटेल, कय्युम मुल्ला, सिकंदर इनामदार ,अल्ताफ सय्यद, युसुफ मुलानी , अब्दुल मुल्ला, असगर इनामदार , नगरसेवक गणीभाई कच्छी , राहीद सय्यद, नजीर मुल्ला, जावेद पटेल , मोहसीन मुल्ला, शफी सय्यद ,शफी इनामदार तौफीक कुरेशी, अंजुम मणेर , इमरान आत्तार आदी मान्यवर व पत्रकार लोणंद पोलीस ठाण्यात उपस्थित होते.