कराड दक्षिण मतदार संघातील पहिली नवीन सोसायटी नांदगावला मंजूर
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड दक्षिण मतदार संघातील नवीन सोसायटी स्थापनेचा प्रस्ताव डॉ.अतुल भोसले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून दिनांक 28 मार्च 2021 रोजी उपनिबंधक कार्यालय कराड येथे सादर केला होता. सदरील प्रस्तावास विभागीय आयुक्त यांच्या समितीने मंजुरी दिली होती. आज दिनांक 11/07/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय श्री.बाळासाहेब पाटील व अतुल भोसले शुभहस्ते. तसेच ,माननीय दयानंद पाटील (संचालक कृष्णा सहकारी साखर कारखाना), सुनील पाटील (संचालक बाजार समिती कराड) व कराड उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी संदीप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्था मंजुरीचे प्रमाणपत्र नांदगाव ग्रामस्थांना देण्यात आले.

याप्रसंगी रघुवीर विकास सेवा सोसायटी नांदगाव चे मुख्य प्रवर्तक दिलीपराव पाटील तसेच नांदगाव गावचे सर्व ग्रामस्थ व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.






















