नागठाणे :-प्रतिनिधी
श्री . समीर शेख , पोलीस अधीक्षक , सातारा व श्री बापू बांगर , अपर पोलीस अधीक्षक , सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगावर , टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा – या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का ) अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांना सूचना दिलेल्या आहेत .
बोरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि . नंबर ०६ / २०२३ भा.द.वि.स. कलम ३ ९ ४ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपी साहिल रुस्तुम शिकलगार व अमित ऊर्फ कन्हैय्या सुनिल साळुंखे रा . नागठाणे यांनी त्यांचे साथीदारांच् मार्फतीने फिर्यादी यांना कोयत्याने , पट्याने , हाताने व लाथाबुक्याने तोंडावर , पाठीवर , व अंगावर मारहाण करुन फिर्यादीच्या जवळी २५,००० / – रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतलेली होती म्हणुन वगैर दिली तक्रारी वरुन गुन्हा रजि दाखल करणेत आला होता .
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी १ ) साहिल रुस्तुम शिकलगार रा . नागठाणे , ता . जि . सातारा २ ) भरत संजय मोहिते रा . नागठाणे , ता . जि . सातारा ३ ) अमित ऊर्फ कन्हैयया सुनिल साळुंखे रा . नागठाणे , ता . जि . सातारा ४ ) आशिष बन्सीराम साळुंखे रा . नागठाणे , ता . जि . सातारा यांनी टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सहा . पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे बोरगाव पोलीस ठाणे यांनी नमुद टोळी विरुध्द दाखल असले गुन्ह्यांची माहिती संकलित केली असता त्यांचेवर जुलुम जबरदस्ती करुन हिंसाचाराची धमकी देऊन किंवा अन्य अवैद्य मार्गाने दहशत व बळाचा वापर करुन खुन , खुनाचा प्रयत्न , अपहरण , दरोडा , जबरी चोरी , जबरी चोरी करताना दुखापत करणे , जबर दुखापत , विनयभंग , घरफोडी , चोरी , कायदेशीर अटकेला प्रतिकार किंवा अटकाव करणे , विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये ( मोक्का ) कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने मा . विशेष पोलीस महानिरीक्षक , कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला .
मा . श्री सुनिल फुलारी , विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी करुन सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेची कलम वाढ करणेची परवानगी देवुन गुन्ह्याचा पुढील तपास श्री . किरणकुमार सुर्यवंशी , उपविभागीय पोलीस अधिकारी , सातारा शहर विभाग सातारा यांच्याकडे देण्यात आला आहे .
माहे नोव्हेंबर २०२२ पासुन ०७ मोक्का प्रस्तावामध्ये १०५ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे . तसेच १ ९ इसमांविरुध्द हद्दपारीसारखी व ०१ इसमास MPDA कायदयान्वये स्थानबध्द करणेत आले आहे . तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का , हद्दपारी , MPDA अशा प्रकारच्या ठोर कारवाया करणे येणार आहेत .
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता श्री . समीर शेख , पोलीस अधीक्षक , सातारा . व श्री . बापू बांगर , अपर पोलीस अधीक्षक , सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री . किरणकुमार सुर्यवंशी , उपविभागीय पोलीस अधिकारी , सातारा शहर विभाग सातारा , श्री . अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा , सातारा श्री . रविंद्र तेलतुंबडे , सहा . पोलीस निरीक्षक , निकम पोलीस