- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 24 : सातारा जिल्ह्यातील मौजे तासगाव येथे जरीआई ओढ्यावर साकव पूल बांधण्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजना 2020-21 अंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने सुचविलेल्या ठिकाणी देखील पूल बांधण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत यासंबंधीच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.