सिंहगड
दि. 18 नोव्हेंबर 2022
छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाणे इतिहासात अजरामर झालेला किल्ला म्हणजे सिंहगड याच सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत हॉटेल,दुकाने, टपऱ्या वन विभागाकडून हटवण्यात आल्या आहेत. सुमारे 125 पेक्षा जास्त अतिक्रमण या वेळी पाडण्यात आले.
गेली कित्येक वर्ष शिवप्रेमी संघटना अतिक्रमण हटवण्याची मागणी करत होते. किल्यावर हुल्लडबाज तरुण, कपल्स, प्रेमी युगलांचा वावर जास्त असतो त्यांना खाण्या पिण्याची सोय हे हॉटेल, स्टॉल वाले करत असल्याने सिंहगडचे पावित्र राहत नव्हते. गडावर कचरा, पाण्याच्या बॉटल यांचे साम्राज्य निर्माण झाले होते यामुळे हे अतिक्रमण हटवणे गरजेचे होते परंतु राजकीय वरदहस्त वापरून स्थानिक गावगुंड कारवाई करू देत नव्हते. संपूर्ण किल्ल्यावर तेथील स्थानिक व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःची मालकी प्रमाणे कब्जा केला होता त्यांना वन विभागाने चांगलाच चाप बसवला.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजल खान याच्या कबरी चे अतिक्रमण पाडण्यात आल्यानंतर त्या पाठोपाठ पन्हाळा किल्ल्यावरील अतिक्रमण राज्य सरकारने पाडण्याचे आदेश दिले आहेत त्याला अनुसरूनच सिंहगडावरील कारवाई झाली आहे असे तेथील अधिकाऱ्या कडून सांगण्यात आले. शिंदे फडणवीस सरकारने किल्यावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिल्याने शिवप्रेमीं मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारवाई तापूर्त्या स्वरूपात न करता यापुढे सिंहगड किल्यावर अशी अतिक्रमण होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. पुन्हा अशी अतिक्रमण दिसल्यास शिवप्रेमी संघटना यावर कारवाई करेल असे नरवीर तानाजी मालुसरे संस्था महाराष्ट्र राज्याचे सचिव रवींद्र तुकाराम मालुसरे यांनी सांगितले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष गणेश खुटवड, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणालजी मालुसरे,
सरनोबत पिलाजी गोळे प्रतिष्ठान पुरंदर तालुकाध्यक्ष देविदास गोळे, सुरज गोळे, शिवभक्त सुशील खोपडे, शुभम पवार उपस्थित होते.