-: महाराष्ट्र शासन , सामान्य प्रशासन विभाग , शासन परिपत्रक क्रमांक बीसीसी / २००४ / १६६६ /प्र क्र . ६१ / ०४ / १६ ब , दिनांक १० ऑगस्ट २००४ अन्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे मागासवर्ग कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात यावी . अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे एका निवेदनाद्वारे केली . त्या निवेदनामध्ये , सातारा जिल्ह्यातील विविध विभागामध्ये मागासवर्गीय कर्मचारी असुन त्यांच्या सेवा विषयक अडी अडचणी व त्यांचे वर होणारे अन्याय किंवा तक्रारीचा तात्काळ निपटारा होणेच्या दृष्टीने शासनाचे निर्देशनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ मागासवर्गीय कक्ष कार्यान्वीत करून त्या कक्षा मध्ये कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकाऱ्याची नेमणुक मागासवर्गीय कक्षात करावी .अशी आग्रही मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने करीत आहोत .