फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील पवारवाडी (आसू) येथील शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलींची शाळा ते बसस्थानक आणि बसमध्ये बसल्यानंतरही एसटी बसचा पाठलाग करणाऱ्या दोघांविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पवारवाडी येथील शाळा सुटल्यानंतर दिनांक २७ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १२:१५ वाजता विद्यार्थीनीकडे बघून हसून, तसेच पीडित विद्यार्थीनी बसमध्ये बसल्यानंतर इरटिगा गाडी नंबर एम. एच. ११ डी. ए. 0६७५ या गाडीतून पाठलाग करत विद्यार्थीनी गाडीतून खाली उतरल्यानंतर साजिद सलीम मुलानी व धनराज दत्तात्रय हांडगर हे पीडित विद्यार्थीनी जवळ आले व त्यातील साजिद मुलानी यांनी पीडितेचा हात पकडून म्हणाला की, तू मला खूप आवडतेस, आय लव यू असे सर्वांसमोर म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






















