फलटण शहरातील सर्वात जुने व देश स्वातंत्र्य होण्या पूर्वी गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांपैकी श्रीमंत शुक्रवार पेठ तालीम गणेश उत्सव मंडळ आहे अशा या फलटण शहरातील मानाचा व नवसाला पावणारा श्रीमंत रामेश्वर महागणपती शुक्रवार पेठ तालीम मंडळ फलटण या मानाच्या व नवसाला पावणाऱ्या गणपतीची आरती दिनांक 7 /9 /2022 रोजीची 8 वाजता माढा मतदारसंघाचे लोकप्रिय व पाणीदार खासदार रणजीत सिंह हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाली.हा यावेळेस आतिशबजी करत व रुद्रावतार ढोल ताशा पथकाच्या गजरात असंख्य भक्तांच्या उपस्थितीत ही श्रींची व फलटणच्या नवसाला पावणाऱ्या पहिल्या मानाच्या गणपतीची आरती खासदारांच्या हस्ते संपन्न झाली.यावेळेस मंडळाचे अध्यक्ष मा. नगरसेवक फिरोज भाई आतार यांच्या हस्ते खासदारांचा सत्कार करण्यात आला यावेळेस शुक्रवारपेठ तालीम मंडळाचे असंख्य कार्यकर्ते , पदाधिकारी ,या वेळेस उपस्थित होते.






















