फलटण : राजाळे, ता. फलटण येथील कै. जयवंत गोपालन गोशाळा संस्थेमध्ये पोलीस विभागाने ८० वासरे आणून सोडली होती. त्यांना उपचारासाठी आसूचे जनावरांचे शासकीय डॉ. राजे, बरडचे डॉ. झांबरे व राजाळ्याचे डॉ. गोडसे होते. त्या ठिकाणी एक वर्षापासून लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण जिल्ह्यात झालेले नाही. या रोगासाठी सहा महीन्यातून एकदा लसीकरण आवश्यक असते. आसपास रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यावर लगेचच पशुसंवर्धन आयुक्त सिंग यांना फोन करून दि. ५ आक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व जनावरांचे 100% लसीकरण चालू करावे अशी विनंती केली होती. आयुक्तांनी लसीची कमतरता असताना देखील सातारा जिल्ह्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे लसीकरण चालू केले आहे. त्याबद्दल आयुक्तांचे आभार मानण्यात आले आहेत.
याचा आता सर्व शेतकरी व पशुपालकांनी लाभ घ्यावा. कारण हा रोग एकदा झाल्यानंतर त्यावर उपचार नसतो. उपचारानंतर देखील जनावर बाद होऊ शकते. यासाठी प्राधान्य देऊन गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. आणि आवश्यकता असल्यास गावामध्ये शिबिर घ्यावयाचे असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन कै. जयवंत गोपालन गोशाळेचे व्यवस्थापक किशोर निंबाळकर यांनी केले त्यांनी केले आहे.