महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य उत्पादन शुल्कचे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांचा मसूर पंचक्रोशीत शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन करून भव्य असा नागरी सत्कार केला. यामुळे कराड उत्तर च्या राजकारणामध्ये नवीन समीकरण जुळल जाण्याची शक्यता वाढलीये. प्रस्थापितांना थोड्याफार प्रमाणात का होईना डिवचण्याचे काम नवीन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत म्हणजे शिंदे गट शिवसेनेकडून करण्यात आले.यामुळे मसूरच्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आजमीतिला तरी दिसते. त्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढणार अशी दाट शक्यता सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्यातच मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या भाषणातून केलेल्या वक्तव्यातून बऱ्याच अंशी भविष्यातील राजकारणाची दिशा ही काय असेल?हे लवकरच समजेल. या कार्यक्रमाचे प्रमुख युवा नेते पवन निकम. यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भव्य नागरी सत्कारामध्ये मसूर व मसूरच्या आसपासच्या ग्रामीण भागातील शिवसैनिक ,कट्टर कार्यकर्ते व महिला आघाड्या आता नव्या जोमाने कामाला लागतील हे बघन औत्सुकत्याच ठरेल.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उत्पादनशुल्क (कॅबिनेट मंत्री)माननीय नामदार शंभुराजे देसाई यांची सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्रीपदी व मा. श्री. मंगेश चिवटे मुख्यमंत्री सहायता विधी कक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्य तसेच मा. श्री. शरद कणसे यांची सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड झालेबद्दल
मसूर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन लोकार्पण सोहळा,व वैद्यकीय मदत कक्ष चे उद्घाटन महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क व सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले… या लोकार्पण सोहळ्यास मसूर व मसूरच्या आसपासच्या भागातील शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.