सातारा – कोयना परिसरात आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.आज सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांनी कोयना परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ किलोमीटरवर होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती.