पत्रकारितेच्या माध्यमातून
समाजासाठी सतत धडपडणाऱ्या युवा व्यक्तिमत्त्वाचा अखेर दुर्दैवी अंत झाला. जीवनाच्या अखेरपर्यंत कोरॉनाच्या लढाईत जीवाची पर्वा न करता लढणारा हा कोरोना योध्दा अखेर धारातीर्थी पडला. नुकतीच त्यांनी इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. या माध्यमातून कार्याची व्याप्ती वाढण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यांच्या कार्याची स्मृती अशीच अजरामर तेवत राहो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच इरा परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.