२५ वी कराड तालुका आंतर शालेय मिनी अॅथलेटिक्स स्पर्धा मध्ये
अर्पिता भरत जाधव प्रथम क्रमांक
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड अर्बन स्पोर्टस् क्लब आयोजन
२५ वी कराड तालुका आंतर शालेय मिनी अॅथलेटिक्स स्पर्धा
कराड अर्बन बँकेच्या मार्फत ज्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या त्यामध्ये यश संपादन करणाऱ्या मुलींचे हार्दिक अभिनंदन आदर्श प्रशिक्षण केंद्र कराड यांची विद्यार्थिनी कुमारी अर्पिता भरत जाधव हिने १९ वर्षाखालील गटात १५०० मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून ती एका सामान्य गरीब घरातून कष्ट करून तिने हित पर्यंत आलेली आहे.तसेच अर्पिता भरत जाधव ही मुलगी जिद्दी कष्टाळू मेहनती आहे तिला अकॅडमी मध्ये काय सांगेल ते ती पूर्णतःस् घेऊन जाते.ती आदर्श प्रशिक्षण केंद्र कराड यांची विद्यार्थिनी आहे.तिचे मार्गदर्शक निलेश पवार यांनी तिला घडविण्यात मोलाची भुमिका निभावली.२५ वी कराड तालुका आंतर शालेय मिनी अॅथलेटिक्स स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
































