बदनामीची भीती घालून उकळले पैसे; बंटी बबली ताब्यात……..
वाईमधील शिवशक्ती पतसंस्थे मध्ये शिपाई पदावर काम करत असणारे जितेंद्र सोपान जाधव वय (३०) रा. बोपेगाव यांना दि. १६/४/२०२२ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पुनम हेमंत मोरे वय (३०) हि भेटली व तुमच्या पतसंस्थेत जॉब मिळेल का असे विचारून मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेज येऊ लागले त्या मेसेजला रिप्लाय दिल्यानंतर बावधन नाका मीलन हॉटेलला भेटण्यास बोलावले भेट ही झाली. भेटण्या आधी च्या काळात मोबाईल वरून मेसेज द्वारे अश्लील चॅटींग झाले. त्यानंतर दोन दिवसांनी पुनम चा पती हेमंत विजय मोरे वय (३०) हा जितेंद्र जाधव यांना व्हाट्सअप वर मेसेज करून धमकावले की तू माझ्या बायकोला मेसेज का करतो तुझे सर्व मेसेज घरी व तुझ्या पतसंस्थेत दाखवतो व तुला मारून टाकतो असे म्हटल्यावर बदनामीच्या भीतीने जाधव यांनी हेमंत विजय मोरे व पुनम हेमंत मोरे हिला जवळपास २,८९,५००/- इतकी रक्कम रोख व बँकेत भरली त्यानंतर हेमंत व पुनम त्याने पुन्हा २,००,०००/- मागणी केली. ते देने अश्यक्य झाल्याने जाधव यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला त्यावर पोलिसांनी हेमंत मोरे याचा शोधघेवुन अटक केली. यावर पोलिसांनी चवकशी केलिअसता हे दोघेही शातिर असल्याचे लक्षात आले. पूनम हिच्याकडे दोन वेगवेगळ्या नावाची आधार कार्ड असल्याचे आढळून आले. हेमंत मोरे हा पुनमशी आपला कसलाही संबंध नसल्याचे दाखवत होता परंतु त्याचे व पूनमचे रेग्युलर बोलणे भेटणे मेसेज चालू होते. त्यांच्या गुन्ह्याची पद्धत पाहता लोकांना मेसेज करून जाळयात ओढणे पैसे उकळणे असा उद्योग ते करत होते. बदनामी मुळे लोकपुढे येऊन तक्रार करत नाहीत.
आरोपी आता अटकेत असल्या मुळे तक्रारदारांनी पुढे येऊन तक्रारींद्याव्यात असे आव्हान वाई पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे. आरोपीना दि. २०/४/२०२२ पर्यंत पोलिसकोठडी देण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे करीत आहेत. सदरची कारवाई अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक सातारा, अजित बो-हाडे, अपर पोलीस अधीक्षक सातारा, तानाजी बरडे, उप विभागीय पोलीस अधिकारी फलटण चार्ज वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन, रविंद्र तेलतुंबडे, स.पो.नि. व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो.कॉ.किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांनी सहभाग घेतला होता.