महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: किशोर गुरव
घुटबंधारे विभाग सातारा अंतर्गत मध्यम प्रकल्प उपविभाग क्र.८ येथे उपविभागीय अभियंता या पदावर कार्यरत असलेले सु.प.गरुड यांची सांगली पाटबंधारे विभाग सांगली येथे पदोन्नतीने कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली आहे.गरुड हे मूळचे कराड तालुक्यातील येनके गावचे असून त्यांनी यापूर्वी सहाय्यक अभियंता श्रेणी २ म्हणून कोयना, म्हेयशाळ प्रकल्पाचे कामकाज पाहिले असून उपविभागीय अभियंता म्हणून कोकनामध्ये खारलेंड प्रकल्पामध्ये काम पाहिले असून ते जानेवारी २०१७ पासून म्हणजेच जवळ जवळ तीन वर्षापासून पाटण तालुक्यातील मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम पाहत होते.त्यांची आत्तापर्यंत ३६ वर्ष ११ महिने एवढी शासकीय सेवा झाली असून त्यांच्या या शासकीय सेवेत उत्कृष्ट अभियंता हा राज्य पुरस्कार मिळाला असून उल्लेखनीय कामगिरी बाबत ५ वेळा वेतनवाढ मिळाली आहे.
शासकीय,सामजिक व शैक्षणिक कामगिरी बाबत अभियंता भूषण,उत्कृष्ट सेवा हे पुरस्कार अभियंता सहकारी संस्था व ऑनरस सोसायटी सांगली यांचे कडून मिळाले आहेत.त्यांनी रोटरी इंटरनेशनलचा अध्यक्ष,सचिव या पदावर काम करत सामजिक कार्य केले असून त्यांचे आता मूळ गावी येणके या ठिकाणी ग्रामसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामजिक कार्य चालू आहे.
ते गेल्या तीन वर्षांपासून मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम पाहत असून त्यांनी कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम पाहिले असलेने मोरना परिसरात पाणी प्रश्न अथवा पूरग्रस्तांचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही तसेच मोरणा प्रकल्पातील कालव्याची कामे,बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्रलंबित होत्या त्या बाबत त्यांनी विशेष प्रयत्न करून जिल्हाधिकारी सातारा यांच्या कडून मंजुरी घेऊन जवळ जवळ ३०० शेतकऱ्यांना १३ कोटीचा मोबदला अदा करण्या मध्ये त्यांचा सिहांचा वाटा आहे.तर शेतकऱ्यांच्या भूसंपादनातील ७/१२ उतारे वरील ऑनलाइन दुरुस्त्या, म्हारवतन जमिनी,देवस्थान जमिनी धर्मादाय परवानगी,कुळकायदा वर्ग २ चा जमिनीच्या परवानगी,मोजणी त्रुटी, वण झाडे मूल्यांकन या शेतकऱ्यांच्या अडचणी मुले मोरणा गूरेघर कालव्यात जमिनी संपदित होत नव्हत्या या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतः गरुड हे महसूल,वण,कृषी,भूमिअभिलेख या कार्यालयांकडे सतत पाठपुरावा करत असे व प्रश्न सोडवित असे आत्तापर्यंत त्यांनी २२ थेट खरेदीचे प्रस्तावांना मंजुरी घेऊन शेतकऱ्यांना मोबदला अदा केला आहे त्याच प्रमाणे खोदकाम केलेल्या जमिनीचे नुकसान भरपाई भाडे पट्टीच्या स्वरूपात मिळणेसाठी त्यांनी त्यांचे प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करून काही प्रस्ताव मंजूर करून घेऊन शेतकऱ्यांना भाडे पट्टीही अदा करण्यात आली आहे.
तर काही शेतकऱ्यांच्या फळ झाडांचे मूल्यांकन करून घेऊन त्यानाही त्याचा मोबदला देण्यात आला आहे एकंदरीत गरुड यांनी मोरणा गूरेघर प्रकल्पात कालव्याचे प्रलंबित काम असो,धरण व्यवस्थापन असो या सर्वात आमूलाग्र बदल घडवून आणला त्यामुळे कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती झालेल्या गरुड साहेब यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनदांचा वर्षाव होत आहे.
आजपर्यंतच्या मोरणा गूरेघर प्रकल्पातील अधिकारी यांच्या इतिहासात सतत शेतकऱ्यांच्या संपर्कात राहणारे केव्हाही रात्री बेरात्री सुट्टीच्या दिवशीही कोणत्याही शेतकऱ्यांच्या दूरध्वनीवरून संपर्कात राहणारे ते एकमेव आधीकारी असून त्यांचे चिरंजीव आंध्रप्रदेश येते आय.पी.एस.अधिकारी आहेत त्यांच्या चिरंजीवाच्या अधिकारी असलेच्या कोणत्याही पदाचा गरुड यांनी आपल्या कामात कधीही वापर केलेला नाही. सुनिल गरुड यांना शुभेच्छा देताना कर्तव्यदक्ष अधिकारी पुन्हा मोरणा गूरेघर प्रकल्पाला लाभणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रिया विभागातील लोकांमधून एकायला मिळत आहेत.