पेडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि;पेडगाव ता. खटाव जि. सातारा संचालक पंचवार्षिक निवडणूक सन 2023-2028 मध्ये श्री गणेश शेतकरी विकास पॅनेल च्या सर्व उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे.
सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून श्री.शत्रुघ्न नागू जगदाळे, हणमंतराव रामचंद्र जगदाळे, भानुदास देवबा जगदाळे, धनाजी ज्ञानू जगदाळे, सतिश श्रीरंग जगदाळे, अजय गुलाबराव जगदाळे, संतोष जयसिंग जगदाळे, संदीप प्रल्हाद जगदाळे महिला राखीव सौ. लता आनंदा जगदाळे मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती मधून श्री शहाजी तुकाराम जाधव व देवदास कुंडलिक मिसळे बहुमताने निवडून आले असून अनिल रघुनाथ कुदळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
पेडगाव विकास सोसायटीने या पूर्वी जिल्ह्यात मिळविलेल्या नावलौकिकात नव्याने भर घालण्याची जबाबदारी नवनिर्वाचित संचालक मंडळावर आली असून, सर्व सभासदांना वेळेत कर्ज वाटप करून कर्ज वसुली बाबत दक्ष राहून संस्था नफ्यामध्ये ठेवल्यास दरवर्षी सभासदांना लाभांश वाटप करता येईल याची खबरदारी घेऊन सोसायटीच्या माध्यमातून नवीन उपक्रम राबविण्यासाठी नवनिर्वाचित संचालकांनी प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पेडगावचे सर्व माजी व आजी मा.सरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे माजी चेअरमन, सर्व संचालक,स्वाभिमानी शेतकरी संघटना व पाणी फाउंडेशन च्या सर्व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सोसायटी संचालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत