फलटण प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सालाबाद प्रमाणे दर्शन व अभिवादन करीता नागरिकांना मुभा असेल नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नये असे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, दिनांक 22.4.2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे.सदर जयंती अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सालाबाद प्रमाणे दर्शन व अभिवादन करीता नागरिकांना मुभा असेल व सर्व कार्यक्रम प्रशासनामार्फत करण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.फलटण शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.






















