महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी :
केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री.अजय कुमार मिश्रा यांचा सातारा जिल्हा दौरा सुरू आहे या दौऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी कराड शहराध्यक्ष श्री.एकनाथ बागडी यांच्यावतीने कराड तालुका टोलमुक्त करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयाभाऊ गोरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले, कराड सरचिटणीस प्रमोद शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल कुलकर्णी, सोशल मीडिया अध्यक्ष शैलेश गोंधकर व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री मिश्रा यांनी नितीन गडकरी साहेब यांच्याशी बोलून तोडगा काढू असे यावेळी आश्वासन शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांना दिले.






















