खटाव :-
डिस्कळ परिसरातील गायी प्रवासी वाहतूकी साठी वापरल्या जाणाऱ्या बोलेरो गाडीतून कत्तलीसाठी न्हेत असताना डिस्कळ – वाठार रस्त्याला गाडी पलटी होऊन अपघातग्रस्त झाली. घटनेची माहिती मिळताच डिस्कळ गावचे ग्रामस्थ सयाजीराव गोडसे,बाळासाहेब नलावडे,संतोष नलावडे, पोलीस पाटील गणेश शिपटे तसेच गोरक्षक, बैलगाडा शर्यतप्रेमी,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे खटाव विभागाचे धारकरी यांनी घटनास्थळी तात्काळ जात गायींना गाडीतून मुक्त केले. अपघातात गायींना गंभीर दुखापत झाली असून याची माहिती पुसेगाव पोलिस स्टेशनला कळवण्यात आली. पोलिसांच्या साहाय्याने अपघात जखमी झालेल्या गायींना जयवंत गोपालन गोशाळेस सुपूर्द करण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त गाडीचा ड्रायव्हर फरार असून त्याविरुद्ध पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व ग्रामस्थांचे,गोरक्षकांचे,बैलगाडाप्रेमींचे व धारकरी बांधवांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक समाजातील विविध स्थरातून होत आहे.






















