वारुंजीत विविध कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड पंचायत समिती, मा. श्री नामदेव पाटील (आप्पा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, वारुंजी सत्यजित महोत्सवाचे आयोजन करण्यात
आते गुरुवार दि २६ मे रोजी भव्य बेलगाडा शर्यत, शुक्रवार दि २७ मे रोजी वारुंजीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उदघाटन व भव्य सत्कार
समारंभ, शनिवार दि २८ मे रोजी रक्तदान शिबीर व रविवार दि २९ मे रोजी झंकार बिट्स ऑर्केस्ट्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,
करण्यात आले
गुरुवार दि २६ मे रोजी नामदेव पाटील (आप्पा) मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भव्य बैलगाडा शर्यती मध्ये सातारा सांगली पुणे ११३ बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. दुपारी १२ शर्यतीचे उदघाटन मा उदयसिंह पाटील दादा, मा. नामदेव पाटील (आप्पा) व वारुंजीचे मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थित झाले. वारुंजी व पंचक्रोशीतील जुन्या २५ बैलगाडा मालकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. एकूण ६ बक्षिसाचे वितरण करण्यात आले. दक्षिस वितरण समारंभास मा. मनोहर भाऊ शिंदे, मा नामदेव पाटील (आप्पा), मलकापूर चे मा नगरसेवक शिंगाडे, कराड मा. नगरसेवक बाळासाहेब यादव व मा नगरसेवक महादेव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती
पहिले बक्षिसे रु ५१०००/- तांबव्याचे भैरवनाथ प्रसन्न जावेद मुल्ला, दुसरे बक्षीस रु ३५०००/- सुपनेचे देवराज शहाजी पाटील, तिसरे बक्षीस रु. २५०००/- मुंढेचे रोहित जमाते, चौथे बक्षीस रु १५०००/- विंगचे महंमद मुजावर, पाचवे बक्षीस रु ११०००/- चे कलेढोण प्रितेश भैय्या तर सहावे बक्षीस रु ५०००/- चे आगाशिव नगरच्या विजया पाटील यांना मिळाले..
शुक्रवार दि २७ मे रोजी वारुजीतीत विविध विकास कामांचा भूमिपूजन उदघाटन व भव्य सत्कार समारंभाचे सदर प्रसंगी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आमदार मा. पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी वारुंजी गणात वारुंजी ने विकास कामात अग्रेसर राहून एकूण २ कोटी १६ लाख रकमेची विविध विकास कामे पूर्ण केली असे गौरव उदगार काढले. या प्रसंगी बोलताना काँग्रेस च्या नेतृत्वातील आघाडीची देशाता गरज असल्याचे प्रतिपादन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करून विरोधकांना मोडित काढण्याचे काम केले. भाजपने सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण लोकशाही धोक्यात आणली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपचा पराभव होऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. भाजपने काँग्रेस मुक्त देश करण्याचा प्रयत्न केला तथापि बहुजनांचा सामान्यांचा व देशाचा विकास हाच काँग्रेस चा विचार आहे. भाजप जनतेला मानसिक गुलाम बनवू इच्छित आहे, त्यात ते यशस्वी झाल्यास आपल्याला पुन्हा पारतंत्र्यात जावे लागेल, असा इशारा देत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या विचारांना साथ देण्याचे आवाहन केले. सदर समारंभात जि. प. सदस्या मा. मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील (आप्पा) व पंचायत समिती सदस्य उचम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रलंबित वारुंजी गावठाण चा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल मा आमदार पृथ्वीराज चव्हाण चावा यांचा वारुंजी ग्रामस्थ व ग्रामपंचायत वारुजी यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आता सदर समारंभात पृथ्वीराज बाबा यांच्या उपस्थितीत मा. नामदेव पाटील आप्पा यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केक कापून करण्यात आले
या कार्यक्रमाता उदयसिह पाटील (दादा) मा मनोहर शिंदे, मा. दिलीप चव्हाण (भाऊ), मा शिवराज मोरे मा जयवंतराव जगताप (नाना), मा भानुदास माळी, मा राजेंद्र माने आप्पा, मा सौ मंगल गलांडे, मा शंकरराव खबाले, मा अजितराव पाटील आप्पा मा निवासराव घोरात मा उत्तम पाटील, मा प्रदीप पाटील, मा पै नाना पाटील, मा सो विद्या धोरवडे, मा सौ नीलम येडगे, मा इंद्रजित चव्हाण, मा फारूक पटवेकर, मा प्रकाश पाटील, मा अतुल शिंदे मा नरेंद्र पाटील, आ शिवाजीराव मोहिते, मा नरेंद्र पाटील, मा नितीन धोरात, मा निवेश जाधव, मा दिग्विजय पाटील, मा वैभव घोरात, मा राजेंद्र यादव (आबा) यांच्या सह श्रीमती शकुंतला शिवाजी पवार व ग्रामपंचायत वारुंजी चे सर्व विद्यमान सदस्य व वारुजीतील सर्व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
शनिवार दि २८ मे रोजी मा. नामदेव पाटील (आप्पा) व्या वाढदिवसानिम्मित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ग्रामपंचायतीच्या हॉल मध्ये आयोजित शिबिरास रक्तदात्पानी भरगोस प्रतिसाद दिला सदर मा. नामदेव पाटील (आप्पा) यानी रक्तदात्यांची आपुलकीने विचारपूस कैली
रविवार दि २१ मे रोजी वारुंजी ग्रामस्थांसाठी ऑर्केस्ट्रा अंकार बिट्स या संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ग्रामस्थांनी या मुराद आनंद लुटता.