महाराष्ट्र न्यूज मायणी प्रतिनिधी : मंगेश भिसे
केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार इथेनॉल प्रकल्पासाठी खटाव माण तालुका अॅग्रो प्रो. लिमिटेड साखर कारखाना पडळ ता. खटावची सर्वप्रथम निवड झाली आहे. पुढील वर्षीच्या गळीत हंगामा पूर्वीं इथेनॉल प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन खटाव-माण अॅग्रो प्रो.लिमिटेड या कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
खटाव-माण अॅग्रो प्रो.लिमिटेड पडळ ता. खटाव या साखर कारखान्याच्या पहिल्या साखरेच्या पोत्याचे पूजनाचा कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. सदर वेळी को- चेअरमन मनोज दादा घोरपडे ,कार्यकारी संचालक संग्राम बापू घोरपडे, संचालक कृष्णात शेडगे,भास्कर चव्हाण महेश घार्गे, विक्रम घोरपडे, जनरल मॅनेजर अशोक नलावडे ,काकासाहेब महाडिक,दत्तात्रेय घोरपडे,किरण पवार,अजित मोरे,जयदीप थोरात,अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाकर घार्गे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कारखान्याच्या प्रत्यक्ष साखर उत्पादनास प्रारंभ झाला असून या साखरेच्या पोत्यांचे पूजन करताना आम्हाला आनंद होत आहे. शेतकऱ्यांच्या उसाला एफ.आर.पी.प्रमाणे ऊस दर दिला जाईल. त्याशिवाय इतर कारखान्या प्रमाणे प्रति टन अर्धा किलो साखर रुपये दहा या अल्प किमतीत कारखान्यास गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला होता त्यांना दिवाळी साठी दिली जाईल.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीमध्ये चांगल्या रिकव्हरीचा व कमी काळात उसाचे उत्पादन कसे येईल यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. सध्या अठरा ते वीस महिन्यांनी ऊस तोड होणे हे शेतकऱ्यांच्या तोट्याचे आहे .त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. काळाची गरज म्हणून बदलत्या जगाबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाची गरज असून खटाव-माण अॅग्रो कारखान्याच्या मार्फत यासंदर्भात शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शन केले जाईल.
यावेळी कारखान्याचे को- चेअरमन मनोज दादा घोरपडे म्हणाले, एक हजार एक, आठ हजार पाच, चारशे एकोणीस, एक हजार एकवीस अशा विविध जातीची साधारणतः अकरा ते बारा महिन्यात ऊस उत्पादन सुरु होणारे बियाणे वापरल्यास ऊसाची उत्पादन चांगले. पर्यायाने शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होईल. या पिकांमध्ये भुईमूग, हरभरा ही पिके घेऊन शेतीचा खर्च देखील कमी करता येतो. उसाची उत्पादकता वाढवणे गरजेचे असून या व्यवसायात नवीन असला तरी या प्रकारचे कार्यक्रम राबवून शेती साठी मार्गदर्शन करण्याचा करण्याचा प्रयत्न कारखान्याच्या माध्यमातून केला जाईल . यासाठी विविध शेती संशोधक व अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न राहील.




















