सातारा – जि.प सातारा हे अनियमिततचे केंद्र बनले आहे आणि अश्या अनियमिततेस हातभार लावण्याचे काम जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी करीत आहेत . सध्या जि . प मध्ये बदलीचा माहोल आहे . आरोग्य विभागा मध्ये मुदतपूर्व बदली मध्ये अशीच एक अनियमितता झाली आहे . जि.प सातारा मधील श्री निकम नामक आरोग्य कर्मचारी यांची मुदत पुर्व बदली ही २ जुलै २०१४ च्या शासन निर्णयाची पायमल्ली करणारी आहे कारण श्री निकम यांनी यापुर्वी ४ वर्षा पुर्वी जि प आरोग्य विभागा मध्ये कार्यरत होते तदनंतर त्यांची बदली प्रा आ केंद्र उंब्रज येथे बदली झाली , मात्र त्यांचा कार्यकाल बदली च्या ठिकाणी न काढता त्यांची नियमबाह्य प्रतिनियुक्ती वरिष्ठांच्या लेखी आदेशा विना काढलेली होती म्हणजेच श्री निकम यांनी त्यांच्या सेवेचा पुर्ण कार्यकाल उंब्रज येथे पुर्ण न करता त्यांच्या मुदत पुर्व बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला तो बेकायदेशीर असुन २ जुलै २०१४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणारा आहे कारण श्री निकम यांनी ४ वर्षा पूर्वी जिल्हा परिषद येथे काम काज केलेले आहे , आणि २ जुलै २०१४ चा शासन निर्णया नुसार १० वर्षा पुर्वी त्याच ठिकाणी कामकाज केले असेल तर पुन्हा त्याच ठिकाणी बदली देण्यात येवू नये , म्हणुनच सदरचा प्रस्तावाची चौकशी करून सदरची मुदत पुर्व बदली रद्द करावी अशी मागणी १ महिन्या पूर्वी कास्ट्राईबने मा विभागीय आयुक्त पुणे व मा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांचे कडे केली होती . मात्र विभागीय आयुक्त कार्यालयातील काही मंडळींनी खुद्द विभागीय आयुक्तांची फसवणुक करून सदरच्या मुदत पुर्व बदली च्या फाईल वर सह्या घेतल्या गेल्याच , विभागीय आयुक्त यांच्या कडे कामाचा व्याप जास्त असल्याने आयुक्त साहेब अश्या फाईल मधील बारकावे पाहु शकत नसतील मात्र जि.प सातारा ते आयुक्त कार्यालय पुणे यांचे अधिनस्त असणारे बरेच अधिकारी / कर्मचारी यांची सदरच्या टिपणी वर सहया असतात मग जिल्हा परिषद च्या कार्यालयीन अधिधक , प्रशासकीय अधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी , मा उप मुख्य कार्यकारी अधिकारी , मा मुख्य कार्यकारी अधिकारी , मा उपायुक्त जि प या जबाबदार अधिकाऱ्यांच्या टिपणी वर सहया असताना अशी अनियमितता होतेच कशी , आणि आता अशी अनियमितता झाली असेल तर मा विभागीय आयुक्त पुणे हे दोषी अधिकारी यांचे वर कोणती कारवाई करणार तसेच सदरची मुदत पुर्व बदली रद्द होणार का ? सदरची बदली रद्द न झाल्यास कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ न्यायालयात दाद मागणार अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी दिली.
सातारा जिल्हा परिषद मध्ये सध्या जास्त प्रमाणात चुकीचे पावलं उचलली जात असुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची यास मुक संम्मती आहे . जर सदर च्या कर्मच्याऱ्या ची बेकायदेशीर प्रतिनियुक्ती होती तर त्या प्रतिनियुक्ती ३ वर्षाच्या कालावधीत त्या कर्मच्या-यास दिलेल्या पगाराची वसुली करण्याचे आदेश ज्ञानेश्वर खिलारी देतील का ?—महारुद्र तिकुंडे