
नटराज मंदिरातील प्रांगणात सादर झालेल्या या गिटार वादनाच्या कार्यक्रमाची सुरुवात या सर्व सर्व कलाकारांनी कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील ..सुर निरागस हो ..या गीताने केली अजरामर झालेल्या या गीताच्या सुरेख सादरीकरणानंतर सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके आणि सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांनी गायलेल्या चाळीस वर्षांपूर्वीच्या.. तोच चंद्रमा नभात या.. भावगीता ला गिटार सारख्या पाश्चात्त्य संगीत वाद्यावर सादर करणे हे जरा कठीणच आणि दुर्मिळ ही. मात्र त्यालाही अतिशय सुरेखपणे सादर करत कलाकारांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या मराठी सुंदर भावगीत आनंतर ..पीचेस डिझेल या लिरिक कॅप्टन यांच्या स्लोअँड या अल्बम मधील ब्लू कम्पोझिशन असणारे एक पद सादर करून विसाव्या शतकात गाजलेल्या या कंपोजीशन ला सादर करण्यात आले .आपल्या अकादमीचे ब्लूज हे नाव ज्या संगीत प्रकाराने सादर झाले त्या ब्लूज या मंडे ब्लूज हा वाक्प्रचार प्रचलित आहे, यावरून ब्लूज ही एक फिलिंग आहे त्याचे रॉक आणि पॉप या सर्व प्रकाराची सुरुवात ब्लूज पासून झाली आहे त्याचेही सुरेख सादरीकरण होत इंडियन ओशन यांचे फोक स्टाइल मधील युफोरिया हे संगीतबद्ध केलेले उडत्या चालीचे गीत कलाकारांनी गिटार वर सादर करत झाकीर हुसेन आणि जॉन मेकले यांच्या शक्ति या बँड मधील एक अतिशय सुंदर असे कॉम्पोझिशन ..लोटस फिट.. सादर करण्यात आले, त्यानंतर कॉन्व्हर्सेशन हे एल. सुब्रमण्यम आणि स्टीफन ग्राफी या खूप मोठ्या वायलिन वादकांचे कम्पोझिशन असणारे कंपोझिशन गिटार वर सादर करण्यात येऊन यामध्ये आपल्या कार्यक्रमाची सांगता कलाकारांनी कर्नाटक शैलीतील ..भाग्यदा लक्ष्मी बारम्मा.. या भक्ती गीतावर करत उपस्थितांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट खरोखरच अवर्णनीय असा होता .
या कार्यक्रमांमध्ये गिटार वादनासाठी आकाश पवार, अर्चित दोशी, आर्या बनकर, जय देवी, निनाद देशमुख, निया दोशी,प्रतीक बंड , साहिल खान ,सेजल झंवर, विजय साळुंखे ,इलेक्ट्रिक गिटार वर चैत्रा स्वामी, हिमांशू कुचेकर, विराज सुतार, तनिष्क दरेकर, गंधर्व राजपूत , वरद कुलकर्णी आणि स्वतः गुरु प्रतीक सदामते सहभागी झाले होते .बेस गिटार ची साथ विराज कुलकर्णी यांनी दिली या कार्यक्रमाचे निवेदन सौ. मृदुला सदामते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अतुल देशपांडे यांनी केले .या वादन सोहळ्यानंतर या सर्व कलाकारांचा सत्कार नटराज मंदिराच्या वतीने सातारा येथील सुप्रसिद्ध सोने-चांदी व्यवसायिक जे.के. देवी अँड संस्थेचे मालक मोहन शेठ देवी आणि मे. गोविंददास रामदास आणि कंपनीचे संचालक नारायण शेठ जोशी यांच्या हस्ते करण्यात आला .या प्रसंगी संगीत मार्गदर्शक अनिल वाळिंबे सौ.उषा शानभाग श्री व सौ शहाणे ,नारायणराव मंदिराचे व्यवस्थापक श्री, चंद्रन ,रमेश हलगेकर आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी मंगळवारी 1मार्च रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत सातारा येथील गुरु कै. डॉ. साधना जोशी यांच्या स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या शिष्य शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करणार असून याच दिवशी सायंकाळी 6 ते 8या वेळेत श्री नटराज नृत्यकला शाळेच्या गुरु सौ .आचल घोरपडे यांच्या शिष्या भरतनाट्यमच्या बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. हे सर्व नृत्य व गायन वादन कार्यक्रम मंदिराच्या श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती कलामंदिरात संपन्न होणार आहेत. महाशिवरात्रीनिमित्त मंगळवार दि. 1 मार्च रोजी नटराज मंदिर सकाळी 6 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते रात्री12 या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापन समितीने दिली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त नटराज मंदिराच्या सभोवताली अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून संध्याकाळनंतर विविध रंगातील एलईडी बल्ब ची ही विद्युत रोषणाई अक्षरशः लक्षवेधी ठरत आहे. सध्या दररोज सायंकाळी होणाऱ्या गायन-वादन कार्यक्रमास ही सातारकरांचा मोठा सहभाग लाभत असून महाशिवरात्रीच्या पर्वावर सातारा जिल्हा वासियांनी या अनोख्या आणि एकमेव अशा नटराज मंदिराला अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.






















