पुसेगाव दि .[ प्रकाश राजेघाटगे ] तो काही फार श्रीमंत नाहीयेत.परिस्थिती जेमतेम म्हणावी लागेल.पण नियत साफ असली की,चांगुलपणा अंगी येतो असे म्हणतात.
कुणाची पैसे परत करायची नियत असते . कुणाची नसते.
ज्यांची नियत चांगली असते ते पैसे परत करतात तर
कुणी घेतलेले काही लाख वर्षानुवर्षे परत देत नाहीत. त्यांना त्याची लाजपण वाटत नाही. आणि ते गरीबही नसतात बरे का!पण अशा लोकांची नियत खराब असते. जे लोकं ओळखीच्या लोकांचे पैसे परत करताना अनेकदा वेडी-वाकडी वळणे घेतात अशी लोकं अनोळखी लोकांचे भेटलेले पैसे परत करत नाही असाच वर्तमानात नियम होऊन बसला आहे.आणि हीच जग-राहटी झाली आहे,पण नियमाला अपवाद हा असाच अपवादात्मक माणसं या जगात आहेत म्हणून या जगात विश्वास नावाच्या गोष्टीला किंमत आहे.
तंञज्ञानाच्या युगात सगळं जग जवळ आले आहे.पहिले आर्थिक व्यवहारासाठी बँकेची वेळ महत्त्वाची होती पण आता सुट्टीच्या दिवशी अगदी चोवीस तास व्यवहार होतात.हे व्यवहार करताना अतिशय बारकाईने केले गेले पाहिजेत असा दंडक असतो,पण नजरचुकीने एखादा अंक किंवा अक्षर चुकला तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते हे आपण अनेकदा पाहिले आहे.असाच प्रसंग श्री.अलोक रमेश देऊरकर(संगमेश्वर कोकण) यांना आला होता पण समोरच्या माणसाची नियत साफ होती त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीला सामना करावा लागला नाही उलट त्यांचा झालेला आदर-सत्काराने ते भारावून गेले.
त्याचे असे झाले की,श्री.अलोक रमेश देऊलकर यांनी स्व- कष्टाने जमवलेले पन्नास हजार रूपये संगमेश्वर(कोकण) येथे आपल्या बँकेतील खात्यावर जमा केले.परंतु बँक खात्याच्या नंबर चुकीचा लिहल्यामुळे ही रक्कम राजापूर ता खटाव जिल्हा सातारा येथील श्री.विलास नानासो घनवट यांच्या खात्यात जमा झाली.दोन दिवस वाट पाहूनही रक्कम खात्यावर जमा होत नाही म्हटल्यावर श्री.देऊलकर यांनी बँकेत चौकशी केली असता ही रक्कम श्री..विलास नानासो घनवट यांच्या खात्यात जमा झाली आहे अशी माहिती बँकेकडून मिळाली.त्यांनी श्री घनवट यांना फोन केला व झालेला प्रसंग सांगितला.श्री.विलास घनवट यांनी लगेचच मान्य केले की,अशी रक्कम माझ्या खात्यात जमा झाली आहे.त्यांनी हे पैसे परत करण्याचे वचन दिले आणि रक्कमेचा स्वीकार करण्यासाठी राजापूर येथे बोलविले.संगमेश्वर(कोकण) येथून आलेल्या श्री.अलोक देऊलकर यांना राजापूर येथे आल्यावर आणखी एक सुखद बसला.श्री.विलास नानासो घनवट यांनी श्री.अलोक रमेश देऊलकर यांचा यथोचित आदर-सत्कार व पाहुणचार केला व त्यांचा रक्कम त्यांना परत केली.या सातारी आदर-सत्कारमूळे श्री.अलोक रमेश देऊलकर हे भावनाविवश झाले व त्यांनी श्री.घनवट यांचे आभार मानले.यावेळी राजापूरचे माजी सरपंच श्री.राजेंद्र घाटगे (बापू ),जिज्याबा मारुती घनवट (बापू), नाना तात्या ,विलास घनवट,मोहन घनवट हे उपस्थित होते .




















