पाटण : पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची मासिक सभा व नूतन अध्यक्ष निवड प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सर्वानुमते पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेयरमन पदी साहेबराव व्यंकट काटे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून संदीप देसाई यांची निवड करण्यात आली.
पाटण तालुक्यातील शिक्षक सहकारी सोसायटी ही नावाजलेली शिक्षक सोसायटी असून मी प्रामाणिकपणे या सोसायटीचे काम करेन, असे मत नवनिर्वाचित चेयरमन साहेबराव काटे यांनी यावेळी व्यक्त केले.
साहेबराव काटे हे प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात तात्या यांच्या विचाराचे व पाटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
या निवडी वेळी प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राहुल खैरमोडे, तालुकाध्यक्ष शशिकांत कांबळे, विजय खांडके, सागर पाटोळे यांची उपस्थिती होती तर निवडी बद्दल राष्ट्रवादीचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, पाटण पंचायत समिती चे सभापती राजाभाऊ शेलार, माजी पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव, प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, प्राथमिक शिक्षक संघ नेते सातारा बळवंत पाटील, प्राथमिक शिक्षक संघ सातारा कार्याध्यक्ष विजय खांडके, प्राथमिक शिक्षक संघ पाटण तालुका सरचिटणीस वैभव जंगम, प्राथमिक शिक्षक संघ पाटण कार्याध्यक्ष दत्तात्रय जगताप, प्राथमिक शिक्षक संघ पाटण कोषाध्यक्ष सागर पाटोळे यांनी अभिनंदन केले.