भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे द्वारा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी ‘स्टँडर्ड्स कॉन्क्लेव – औद्योगिक संगोष्ठि’ चे होटल लेमन ट्री येथे आयोजन केले. या कार्यक्रमात औद्योगिक जगतातील व्यक्तींनी, विविध प्रयोगशाळांनी व सरकारी विभागातील अधिकारी यांनी उपस्थिति लावली व कार्यक्रमात 100 हून अधिक प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमचे अध्यक्ष श्री एस डी राणे, बीआयएस पुणे शाखा कार्यालयाचे संचालक आणि प्रमुख यांनी सर्व सहभागी आणि मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री मनीष अग्रवाल, अध्यक्ष, मराठवाड़ा एसोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज एंड एग्रीकल्चर हे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या व्यक्तव्यात बीआईएस कडून घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची प्रसंसा केली व बीआईएस मानांकन उद्योजकांना कशाप्रकारे लाभदायक ठरते यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला श्री ए के राव, निदेशक एवं प्रमुख, सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रयोगशाळा कशा प्रकारे सुदृढ औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सहकार्य करू शकतात या बद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला श्री विश्वनाथ भोंबे, उप निदेशक, उद्योग विभाग, महाराष्ट्र सरकार यांनी सर्व प्रतीभागींना महाराष्ट्र शासन तर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन केले. तसेच बीआईएस मानांकन प्राप्त करण्यासाठी उपस्तीत सर्व उद्योगजगतातील प्रतिभागियांना आव्हान केले .
कार्यक्रमात श्री सुनील किर्दक, अध्यक्ष, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII), मराठवाड़ा क्षेत्र यांनी उद्योग नवकल्पना आणि अवसंरचना यांची शाश्वत आणि सुदृढ औद्योगिक विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे विचार मांडले.
याशिवाय, कार्यक्रमात मानकीकरण, उत्पादन प्रमाणपत्रे, गुणवत्ता नियंत्रण आदेश (क्यूसीओ) आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) दिल्या जाणाऱ्या सवलती यांची माहिती देण्यात आली. या चर्चांमध्ये बीआयएसने उद्योगांना, विशेषतः एमएसएमईंना, अनुपालन साध्य करण्यात आणि त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप औपचारिक आभार प्रदर्शनाने झाला, ज्यामध्ये सर्व मान्यवर, वक्ते आणि सहभागींचे त्यांच्या अमूल्य योगदानासाठी आभार मानले गेले. या कार्यक्रमाला यशस्वी बनवल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.