महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
निमसाखर तालुका इंदापूर या ठिकाणी २० ते २१ वानर गेले काही दिवस झाले गावात आले आहेत. निमसाखर या ठिकाणी निरा नदी पाञात चांगले पाणी आहे . तसेच गावात झाडाची संख्या हि चांगल्या प्रमाणात असल्याने झाडाचा पालाही मुबलक प्रमाणात असल्याने काही केल्या वानरे गावातून जाण्याचे नाव घेत नाहीत
गावातील नागरिक व लहान मुले घरावर , झाडावर आलेले वानर पाहण्यास घराबाहेर येत आहेत . शाळेतील मैदानात वानरे खेळत असल्याचे दिसत आहेत. एका घराच्या छतावरून दुसरे घराच्या छतावर उड्या मारत आहेत . त्यांनी अजून तरी काहीही नुकसान किंवा कोणासही इजा केली नाही .
शिखर शिगणापुर या ठिकाणची वानरे आले असण्याची शक्यता असल्याचे मत जेष्ठ नागरिक सांगत आहेत.