सातारा जिल्हा बॅंक व पाटण अर्बन बॅंकेच्या माध्यमातून पाटण येथील कोरोना केअर सेंटरला दोन बायपॅप मशिन भेट
पाटण प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी म्हणून पाटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्यासाठी तालुक्यात ऑक्सिजन अभावी कोणाच जीव जावू नये याकरीता माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक व पाटण अर्बन बॅंक यांच्याकडून पाटण येथील कोरोना केअर सेंटरला तालुक्यात प्रथमच दोन बायपॅप मशिन देण्यात आले आहेत. याचा तालुक्यातील बाधित रुग्णांला चांगला फायदा होणार असून हे बायपॅप मशिन रुग्णांच्यासाठी वरदानच ठरणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.सातारा जिल्हा बॅंक व पाटण अर्बन बॅंकेच्या माध्यमातून पाटण येथील कोरोना केअर सेंटरला दोन बायपॅप मशिन तालुक्याचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, डॉ. श्रीनिवास बर्गे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, तालुक्यातील बाधित रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेर बेडसाठी कराड, सातारा येथे जावे लागत होते. तेथे जावूनही त्यांना बेड मिळत नसल्याने रुग्ण दगावत होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी रुग्णांची होणारी अडचण ओळखून तालुक्यातच रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी स्वनिधीतून ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर तालुक्यात एकही व्हेंटिलेटर नसल्याने व्हेंटिलेरप्रमाणेच काम करणारे बायपॅप मशिनही जिल्हा बॅंक व पाटण अर्बन बॅंकेच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या सेवेसाठी दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा रुग्णांना फायदा होईल. अजूनही प्रशासनाला काही मदत लागल्यास ती निश्चितच आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन देवून तालुक्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका यांच्यासह महसूल विभाग, पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी कोविड काळात चांगले काम केले आहे. या सर्वांच्या प्रयत्नामुळेच आज तालुक्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, पाटण अर्बन बॅंकेेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, संचालक दिलीपराव मोटे, व्यवस्थापक के. आर. शिंदे, अनिल बनसोडे, सातारा जिल्हा बॅंकेचे विभागीय विकास अधिकारी शंकरराव मोरे, सुधाकर देशमुख, पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे आदी उपस्थित होते
पाटण कोरोना केअर सेंटर
कोविडमध्ये गंभीर असलेल्या रुग्णांची प्रकृती अचानक खालावते. अशावेळी रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने रुग्ण दगावतात. मात्र बायपॅप हे मशिन मायक्रो मशिन असून ते एखाद्या व्हेंटिलेटरच्या प्रमाणेच काम करत असल्याने रुग्णांना ते संजीवनी ठरणार आहे.
डॉ. श्रीनिवास बर्गेे
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी मागणी केल्यानुसार सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष छ. शिवेंद्रराजे भोसले, बॅंकेचे सीईओ डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी तालुक्यातील कोविड रुग्णांच्यासाठी अजून 3 व्हेंटिलेटर देण्याचे मान्य केले आहे. लवकरच तेही प्रशासनाकडे सुपूर्द केले जातील. हे सर्व मशिन कायम स्वरूपी रुग्णालयात बसवण्यात यावेत. जेणे करून कोविडनंतरही त्याचा फायदा तालुक्यातील रुग्णांना होईल.
सत्यजितसिंह पाटणकर
नेते राष्ट्रवादी, पाटण विधानसभा मतदारसंघ