वाई तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांची दि. २८ एप्रिल, २०२२ रोजी शिवसेना भवन वाई येथे किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होऊन वाई तालुका पदाधिका-यांचा शेतकरी विकास पॅनेलला पाठिंबा शिवसैनिकांनी जाहीर केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत असूनही वाई तालुक्यातील कुठल्याही पदाधिका-याला विश्वासात घेतले जात नाही, मागील निवडणूक लढविणे गरजेचे असताना आजच्या विरोधकांनी पॅनेल टाकले नाही, गतनिवडणुकीत शिवसेनेने पॅनेल टाकले असताना विरोधकांनी बघ्याची भूमिका घेतली. आता महाविकास आघाडीचे पॅनेल जाहीर असल्याचे सांगत असले तरी त्यामध्ये उमेदवारांत शिवसैनिक एकही नाही. महाविकास आघाडी नावापुरतीच आहे. आता कारखाना अडचणीत असताना विरोधकांनी पॅनेल न टाकता, कारखाना अडचणीतून बाहेर काढणे, गरजेचे होते, यामध्ये शेतक-यांचे हित झाले असते. परंतु जर निवडणूक लढविली नाही तर विधानसभेला फटका बसेल, याच उद्देशाने निवडणूक लढविली जात आहे. त्यास शेतकरी बचाव हित हे गोंडस नाव दिले गेले आहे. कारखाना आर्थिक अडचणींतून आज-उद्या बाहेर पडेल, पण तो जर कोणाच्या खाजगी ताब्यात गेला तर तालुक्यातील एक प्रमुख संस्था संपलेली असेल, असे शिवसैनिकांचे मत झाले आहे.सत्ताधारी पॅनेलकडून काही चूका झाल्या असतील त्यापेक्षा राजकीय हेतूने कारखाना अडचणीत आणण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात होते. ही वस्तुस्थिती आहे. आज शेतक-यांच्या नावाने मते मागत आहेत, त्यावेळी शेतक-यांच्या अन्नात मीठाचा खड़ा विरोधकच टाकत होते. आपल्या कारखान्याला ऊस न घालणे, कार्यकर्त्यांना ऊस घालून न देणे, कारखान्याला कर्ज न मिळवून देणे, येनकेन प्रकारे राजकीय व्देषापोटी कारखाना बदनाम करणे, अडचणीत आणणे, याशिवाय कारखाना या संकटांतून बाहेर काढणेसाठी विरोधकांनी काय केले, असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे ग्रामपंचायत निवडणुकीत कुठेही शिवसेनेला सहकार्य न करता ठिकठिकाणी महाविकास आघाडीतीलच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वाई तालुक्यात शिवसेनेला अडचणीत आणले. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी शेतकरी सभासदांचे हितासाठी शेतकरी विकास पॅनेल बरोबर ज्या त्या भागातील विभागप्रमुख, शाखा प्रमुख व त्या ठिकाणी असणारेबस्थानिक शिवसैनिक यांनी शेतकरी विकास पॅनेलला मतदान व आपल्या विचाराच्या मतदारांना ( सभासदांना) विमान या चिन्हावर मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी या निवडणुकीत लवकर निर्णय न घेतल्यामुळे वाई तालुक्यातील पदाधिका-यांनी बैठक घेऊन स्थानिक शिवसैनिकांनी निर्णय घेतला आहे. या बैठकीस वाई तालुका प्रमुख अनिल शेंडे, दिलीप पवार, विवेक भोसले, किरण खामकर, गणेश जाधव, तुळशीदास पिसाळ, दत्तात्रय इथापे, धनाजी बाबर, प्रकाश बाबर, नंदकुमार नायकवडी, शशिकांत घाडगे, गणेश किर्दतरमेश जाधव, अक्षय चव्हाण, नारायण सणस, प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते.