कराड तहसीलदार कार्यालयात शनिवार, दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता महसूल सप्ताहानिमित्त सैनिक हो तुमच्या उपक्रमातर्गंत सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व कराड तालुका माजी सैनिक संघटनेचे तालुका प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी दिली. दरम्यान, मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे तसेच आपल्या समस्या लेखी स्वरुपात घेवून याव्यात असेही आवाहन त्यांनी केले आहे.
कराड तहसील कार्यालयात कराड तालुक्यातील आजी माजी | सैनिक व त्यांचे कुटुंबीय, विधवा पत्नी, शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या संदर्भात आणि तक्रारी सोडवण्यासाठी महसूल सप्ताह निमित्त सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमा अंतर्गत सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी कराड व तहसिलदार कराड यांनीसभागृह तहसीलदार कार्यालय तिसरा मजला येथे उपलब्ध करून दिला आहे.
कराड तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड, उपविभागीय कृषी अधिकारी, उपनिबंधक सहकारी संस्था, तालुका कृषी अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद, उपअधीक्षक भूमि अभिलेख, वनक्षेत्र पाल, उप अभियंता महावितरण, गट विकास अधिकारी पंचायत समिती कराड आणि सैनिक कल्याण अधिकारी सातारा हे मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.