दहिवडी : ता.०४
नातेपुतेच्या एका तरुणाने वावरहिरेजवळील दानवलेवाडी येथे आत्महत्या केली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अमित पोपट जोरे (मूळ.रा.नातेपुते, सध्या रा.दानवलेवाडी,वय -सुमारे २७) या युवकाने घाडगेमळ्याजवळ रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कामानिमित्त तो दानवलेवाडी येथे राहत होता. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याची चर्चा स्थानिक लोक करत होते. तो विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच शिंगणापूर ठाणे अंमलदार संदीप खाडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे.






















