दहिवडी : ता.०४
पारगाव खंडाळा येथील युवकाने शिखर शिंगणापूर याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश बाळू ओतारी (वय-25) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत शिंगणापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास शिंगणापूर येथील विश्रामगृह परिसरातील झाडाला एका अज्ञात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. स्थानिकांनी याबाबतची खबर शिंगणापूर पोलिसांना दिली. त्यानंतर शिंगणापूर पोलीस व पोलीस पाटील यांनी अधिक माहिती घेतली असता हा युवक पारगाव खंडाळा येथील असून त्याचे नाव गणेश बाळू ओतारी असल्याचे समजले. शिंगणापूर येथील मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये हा युवक आठ दिवसांपासून वेटरचे काम करत होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून आकस्मित मृत्यूची नोंद शिंगणापूर पोलिसांत झाली आहे.
































