दहिवडी : ता.०८
सुरुपखानवाडी येथील आदर्श शेतकरी रामचंद्र गणपत कोकरें यांचे रविवारी 8 रोजी सकाळी 6.30 च्या दरम्यान राहत्या घरी वृद्धापकाळाने वयाच्या 78 वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळ हळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. ते सुरूपखानवाडी गावचे माजी उपसरपंच, सैनिक बँक महाराष्ट्र राज्य व महिमानगड विकास सोसायटीचे विद्यमान संचालक बंडू कोकरे आणि विद्यमान उपसरपंच बाळू कोकरे यांचे ते बंधू होत.
सावडने विधी मंगळवारी सकाळी 8 वाजता होणार आहे.






















