महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: (सुरवडी )
लोणंद फलटण रोड वरून सुरवडी गावात जाताना रेल्वेचा भराव असून. सदर भरावा हा रेल्वे वाहतूक सुरु झाल्यानंतर पूर्वेकडील बाजूला वळसा घालून जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रस्ता बनवला होता. सदर रस्ता खड्ड्यात आहे की, खड्ड्यांवर रस्ता आहे? असे वाटावे इतकी दयनीय अवस्था या रस्त्याची मागील दोन वर्षापासून झाली आहे. सदर रस्ता रेल्वे प्रशासनाने ज्या ठेकेदाराला दिला होता त्या ठेकेदाराने रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा बनवलाय की तो सहा महिने सुद्धा टिकला नाही. रेल्वे प्रशासनाने किंवा त्यांच्या बांधकाम विभागाने रस्ता पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची पाहणी केली किंवा नाही. पाहणी न करताच सदर ठेकेदाराला त्याचं बिल कसं दिलं? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक, कामगार, व ग्रामस्थ वारंवार करत आहेत.
ग्रामपंचायत मार्फत सदर रस्त्याच्या प्रश्नासाठी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार मुंबई ऑफिस कडे केला असून वारंवार पाठपुरावा सुरू आहे. तसेच वेळ पडल्यास ग्रामपंचायत मार्फत आंदोलन करणार आहोत जितेंद्र साळुंखे पाटील सरपंच ग्रामपंचायत सुरवडी