शिवथर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विठ्ठलाच्या चरणी साकडे घालण्यासाठी श्री. हणमंत सीताराम ढवळे यांनी सायकलवरून वाई ते पंढरपूर असा प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पनेला बळ प्राप्त व्हावे यासाठी चौक इलाका ग्रुप शिवथर चे कार्यकर्ते व शिवथर गावचे ग्रामस्थ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका समोर त्यांचा सत्कार केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला बळ मिळावे यासाठी विविध स्तरातून मराठा समाज उपोषण व इतर मार्गाने प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे श्री. हणमंत सीताराम ढवळे यांनी वाई, आरफळ, लोणंद पालखी मार्गे, पंढरपूर सायकलवरून प्रवास करून विठ्ठलाच्या चरणी साकडे घालण्याचा संकल्प केला आहे. व म्हसवड, गोंदवले, पुसेगाव, करत आरफळ येथे सांगता होणार आहे. वाई पासून सायकलवरून प्रवास करत आरफळ येथे ह.भ.प हैबत बाबा यांच्या मंदिरातून दर्शन हणमंत ढवळे यांनी प्रवास करत असताना त्यांच्या संकल्पनेला बळ मिळावे यासाठी चौक इलाका गणेशोत्सव मंडळ शिवथर चे कार्यकर्ते व शिवथर गावचे ग्रामस्थ यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या स्मारका समोर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. हणमंत ढवळे हे वाई येथे खाजगी शिकवणी घेण्याचे काम करतात. त्यांचे कोरेगाव तालुक्यातील एकंबे गावचे रहिवासी आहेत. 1998 साली 1 मार्काने NEET च्या पात्रता परीक्षेतून बाहेर पडल्यामुळे हणमंत ढवळे यांची शिक्षक होण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याची खंत अजूनही वाटत आहे. आपण जे भोगले आहे ते आपल्या पुढच्या पिढीला भोगावं लागु नये. असे मनोगत उपस्थित मराठा बांधवांसमोर व्यक्त केले.